मुंबईत मोठा दहशतवादी कट उधळण्यात पोलिसांना यश आले (bombs)असून या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून मुलांच्या खेळण्यांमध्ये लपवलेले संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात या खेळण्यांचा वापर स्फोटक उपकरणे बसवण्यासाठी करण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.(bombs) मुंबईतील कुर्ला आणि खडवली परिसरातून अटक करण्यात आलेले संशयित ऑनलाइन माध्यमातून कट्टरतावादी विचारांच्या प्रभावाखाली आल्याची माहिती समोर येत आहे. टेलिग्रामसारख्या एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केले जात होते, असे तपासात उघड झाले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे संशयित दैनंदिन वापरातील वस्तूंचा वापर (bombs)करून कमी खर्चात मोठा परिणाम घडवण्याच्या तयारीत होते. विशेष म्हणजे या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सध्या जप्त साहित्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून या कटामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *