कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना (money)आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा कमी पगार मिळणार आहे. १ एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात बदल करण्यात आले. यामध्ये वेतन रचनेतदेखील बदल करण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे.आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या ५० टक्के असणे अनिवार्य आहे. याआधी २० किंवा ३० टक्के होती. यामुळे तुमचे पीएफचे पैसे जास्त कट होती. पीएफ हा बेसिक सॅलरीवर अवलंबून असतो. परंतु आता पीएफ जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे.

त्यामुळेच एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. (money)सरकारने नवीन Code on Wages 2019 आणि Code on Social Security 2020 लागू केले आहेत. सॅलरीत बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियम बेसिक सॅलरी सीटीसीच्या निम्मी म्हणजे ५० टक्के असणे अनिवार्य आहे.जुन्या नियमांनुसार, बेसिक सॅलरी खूप कमी असायची. काही ठिकाणी एकूण पगाराच्या २० ते ३० टक्के बेसिक सॅलरी दिली जायची. बाकी रक्कम एचआरए, स्पेशल अलाउंट, एलटीसी आणि इतर भत्त्यांमध्ये दिली जायची. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी जास्त मिळायची. तेव्हा पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये बेसिक सॅलरीच्या आधारे पैसे जमा केले जायचे. त्यामुळे हे पैसे कमी जमा व्हायचे.

नवीन नियमांनुसार, आता पगारातील ५० टक्के रक्कम बेसिक सॅलरी असणार आहे. (money)त्यामुळे तुमचे पीएफ आणि ग्रॅच्युटी फंडमध्ये जास्त योगदान जमा होणार आहे. पगारातील बेसिक सॅलरीमधील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते.उदाहरणार्थ जर तुमचा एकूण पगार १ लाख रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी ५०,००० रुपये असणार आहे. त्यातील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्यामुळे ६००० रुपये पीएफ खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे पीएफमधील योगदान वाढणार आणि एकूण पगार कमी येणार आहे.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *