आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम जगावर होत आहे.(refrigerators) दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या आणि एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदादारांच्या खिशाला फटका बसणार आहे.एलपीजी गॅसचा तुटवडा होता. त्यामुळे अनेकांना इलेक्ट्रॉनिक शेगडी वापरण्याचा पर्याय निवडला.दरम्यान आता इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणीदेखील खूप वाढली आहे. त्यामुळे शेगड्यादेखील मिळत नाहीयेत. काही प्रमाणावर इंधनाचे टंचाईमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू येत नाहीत. युद्ध अजून काही दिवस असं सुरू राहिला तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणखी मागण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर बसताना दिसत आहे.

जीएसटी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. (refrigerators) मात्र, आता आखाती देशातील युद्धाचा परिणाम कच्च्या मालाच्या आयातीवर झाला आहे. यामुळेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत तब्बल १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच इंधन टंचाईमुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने महागाईचा भार अधिकच वाढला आहे.उन्हाळ्यामुळे एसी, कुलर, फ्रिज यांची मागणी वाढलेली आहे. परंतु कच्चा माल आयात होत असल्याने, प्रवास खर्चदेखील वाढल्याने या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक शेगड्यांचीही टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. (refrigerators) येणाऱ्या काळात युद्धस्थिती कायम राहिल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.टीव्ही एसीच्या किंमती वाढल्या आहेत. आधी ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ६,५०० रुपयांना मिळायचा. आता हे दर ८,५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. लवकरच हे दर १०,००० रुपयांवर जाऊ शकतात. तसेच १.५ टनचा एसी मागच्या वर्षी ३२,००० ते ३४,००० रुपयांपर्यंत मिळायचा. आता हे दर ३७,००० ते ४०,००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार