सध्या सगळेच डिजीटल माध्यमांचा वापर त्यांच्या महत्वाच्या गोष्टी (numbers) सेव्ह करण्यासाठी करतात. त्यात Whatsappमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा साठा असतो. कारण बरेचसे महत्वाचे चॅट, PDF, फोटो यामध्ये पीन करुन ठेवता येतात. पण याचा गैरवापर झाला तर? ही एक भीती सगळ्यांच्याच मनात असते.आता बदलत्या Whatsapp अपडेटमुळे अनोखळी नंबरवरुन कॉल यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये साफबर क्राइम, डेटा चोरी, हॅकर्स किंवा ब्लॅकमेलिंगसारखे लोक फसवू शकतात. जर तुम्हालाही हे फेक कॉल्स येत असतील तर तुम्ही काही सेटिंग्सच्या मदतीने ही समस्या दूर करु शकता. पुढे याच्या सोप्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत.

Whatsapp च्या सायलन्स अननोन कॉलर्स ‘ या नव्या फिचरच्या(numbers) मदतीने तुम्ही फेक कॉल्सच्या समस्या दूर करु शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचे Whatsapp उघडावे लागेल. मग वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. मग सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा. आता तुम्हाला कॉल्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Silence Unknown Callers हा पर्याय दिसेल. हा तुम्ही ऑन करु शकता. या सोप्या स्टेप्सने तुम्हाला अनोखळी कॉल्स येणार नाहीत.

ही सेटिंग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा चालू करता येते, बंद करता येते. (numbers)जर तुम्हाला अनोळखी कॉल आला तर तुमची वैयक्तिक माहिती त्यांना देणं टाळा. जास्त वेळ त्यांच्याशी बोलू नका. तसेच त्यांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. तसेच ओटीपी किंवा बॅंकेची माहिती त्यांना अजिबात देऊ नका.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *