गुजरातमध्ये अन्नसुरक्षेच्या तपासणीदरम्यान कोल्हापुरी गुळामध्ये (jaggery)रासायनिक रंगांचा वापर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकत गुळाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. प्राथमिक तपासात काही नमुन्यांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर झाल्याचे निदर्शनास आले असून यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या कारवाईनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली(jaggery) असून त्यांनी निषेध म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सर्व गुळ उत्पादकांवर संशय घेणे चुकीचे असून काही मोजक्या प्रकरणांमुळे संपूर्ण व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे निष्पक्ष तपासणी करून दोषींवरच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना गुळ खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (jaggery)संशयास्पद रंग किंवा चमक असलेला गुळ टाळावा आणि प्रमाणित विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *