वास्तूशास्त्रात घराबाबत, घरातील गोष्टींबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत.(kitchen) वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेने असावी. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते बेडरूम, बाथरूम आणि पूजा खोलीपर्यंत अनेक नियम आहेत. स्वयंपाकघराबाबतही काही नियम आहेत जे योग्यरित्या पाळल्यास घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही.स्वयंपाकघराशी संबंधित एक चूक आहे जी लोक अनेकदा करतात.त्यातील एक गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात ठेवला जाणारा डस्टबिन. वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नये. सोयीसाठी, बरेच लोक स्वयंपाकघरात तसेच बाहेरही डस्टबिन ठेवतात, परंतु असे करणे योग्य नाही. त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

शास्त्रांनुसार, स्वयंपाकघरात कचराकुंडी ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहत नाही असं म्हटलं जातं. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरातील सदस्यांना नेहमीच चिडचिड वाढू लागते. तसेच, लोक कोणत्याही कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. (kitchen)तसेच आपण अनेक गोष्टी त्या कचऱ्यात टाकत असतो. त्या घाणीमुळे अनेकदा ती नकारात्मकचा नकळत का होईना पण घरातही पसरू लागते. आकर्षित होते. त्यामुळे शक्यतो स्वयंपाकघरात कधीही कचराकुंडी ठेवू नये असं म्हटलं जातं.

आता प्रश्न असा आहे की जर डस्टबिन स्वयंपाकघरात ठेवायचा नसेल तर तो कुठे ठेवावा? स्वयंपाकघरातील डस्टबिन स्वयंपाकघराबाहेर ठेवावा. डस्टबिन कधीही घराच्या मुख्य गेटवर देखील ठेवू नये. कारण देवी लक्ष्मी मुख्य दारातूनच घरात प्रवेश करते. अशा परिस्थितीत, या ठिकाणी डस्टबिन ठेवणे योग्य नाही असे मानले जाते. जर डस्टबिन घराच्या नैऋत्य किंवा वायव्य दिशेला ठेवला असेल तर ते करणे योग्य आहे. (kitchen)डस्टबिन कधीही घराच्या आत ईशान्य दिशेला चुकूनही ठेवू नका. तसेच, आग्नेय दिशेने ठेवणे योग्य नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय