आशिया कप 2025 मध्ये मोठा बदल: इतिहासातील टॉप-3 धावफलंदाज यंदा अनुपस्थित,(history) जाणून घ्या का नाही खेळणार विराट, रिझवान आणि रोहित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या वेळची स्पर्धा खास मानली जात आहे कारण वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. विशेष म्हणजे या वेळेस आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होतील, त्यापैकी पाकिस्तान आणि भारताने आपले संघ जाहीर केले आहेत.या वेळी एक गोष्ट मात्र सर्व चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे—टी20 आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे तिघे दिग्गज खेळाडू यंदा मैदानात उतरलेले दिसणार नाहीत. हे तिघे म्हणजे विराट कोहली, मोहम्मद रिझवान आणि रोहित शर्मा.
विराट कोहली : विक्रमवीर पण टी20 निवृत्तीमुळे गैरहजर भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा “किंग” म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा आशिया कप टी20 इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 10 सामन्यांतील 9 डावात तब्बल 429 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 85.80 इतकी अफाट असून स्ट्राईक रेट 132 च्या वर होता.(history) या प्रवासात विराटने 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली होती. मात्र 2024 च्या वर्ल्ड कपनंतर विराटने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मोहम्मद रिझवान : सातत्य गमावल्याने संघाबाहेर पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवान आशिया कप टी20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 6 सामन्यांत 56.20 च्या सरासरीने 281 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 3 दमदार अर्धशतकंही झळकली आहेत.(history) परंतु गेल्या काही महिन्यांपासून रिझवानची कामगिरी घसरली. सातत्यपूर्ण अपयशामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यंदाच्या आशिया कपसाठी त्याला संघात स्थान दिले नाही. त्याचबरोबर बाबर आझमलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
रोहित शर्मा : विजयी कर्णधाराचीही निरोपाची वेळ भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 9 सामन्यांत 271 धावा केल्या आहेत. सरासरी 30.11 आणि 141 चा स्ट्राईक रेट या आकडेवारीतून रोहितची आक्रमक फलंदाजी दिसून येते. त्याने या कालावधीत 2 अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र 2024 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर रोहितनेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे विराटबरोबरच त्याचा अनुभव भारतीय संघाला गमवावा लागत आहे.

एक मोठा पोकळा विराट, रिझवान आणि रोहित हे तिघे खेळाडू आशिया कप टी20 इतिहासातील टॉप-3 धावफलंदाज आहेत. त्यांची अनुपस्थिती म्हणजेच स्पर्धेतला मोठा पोकळा ठरतोय. चाहत्यांना त्यांच्या जबरदस्त फलंदाजीचे दर्शन यंदा घडणार नाही, मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी तरुण खेळाडू पुढे सरसावलेले दिसतील. आशिया कप 2025 हा त्यामुळे जुन्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत नव्या ताऱ्यांना आपली चमक दाखवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय