आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. (due to rain) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.2 ओव्हरचा खेळ झाला. त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु होईल अशी आशा होती. मात्र अखेर खेळपट्टीची परिस्थिती पाहून सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आता सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होतो की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

स्पर्धेतील 19 व्या (due to rain) मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चाहत्यांचं सामन्याआधी टॉस कोण जिंकतो? याकडे लक्ष होतं. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे30 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *