आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवण्यात आली आहे.(extended) यावर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. दरम्यान, आता आयटीआर फाइल करण्यासाठी २०-२५ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्यांनी आयटीआर भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर भरावेत. दरम्यान, आता टॅक्स भरण्यासाठी डेडलाइन वाढवली जाऊ शकते.गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि देशातील अनेक कर तज्ज्ञांनी सरकारला याबाबत विनंती केली आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवावी, अशी विनंती केली आहे. कारण त्यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट वेळेवर आयटीआर फाइल करु शकणार नाहीत.जीसीसीआयने सीडीबीटी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळला पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, करदाते आणि व्यावसायिकांना अनेक व्यावहारिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असं सांगितलं जातं.

१. आयटीआर युटिलिटिज आणि फॉर्म उशिरा जारी होणे
२.सिस्टीममधील काही अडचणी, लॉग इन करण्यास समस्या (extended)अशा तांत्रिक अडचणी
३. फॉर्म 26AAS, AIS, TIS अपडेटमध्ये समस्या
४. नवीन आर्थिक फॉर्मॅट लागू होण्यास विलंब
५. ऑगस्ट ते नोव्हेंबरमधील सणांचा परिणाम

GCCI मध्ये नॉन ऑडिटमधील आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.या वर्षी पहिल्यांदा आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवण्यात आली आहे. यामध्ये आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलैवरुन १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. (extended)दरम्यान, CBDT ने सांगितलं की, आयटीआर फॉर्म आणि त्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी कमीत कमी कालावधी लागेल. म्हणूनच डेडलाइन वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय