संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून कौटुंबिक (shocking incident) छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप ताजे असतानाच ही घटना उघड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ईश्वरी बनकर असे मृत महिलेचे नाव असून छावणी पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती अजय अशोक बनकर याच्यासह सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरीचा विवाह २८ जून २०२० रोजी झाला होता. लग्नानंतर ती भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनी येथे सासरच्या कुटुंबासोबत राहत होती. मात्र लग्नानंतरपासूनच तिच्या आयुष्यात त्रासाची मालिका सुरू झाली.

अजय बनकर हा रोज (shocking incident) मद्यप्राशन करून घरी येत असे आणि किरकोळ कारणांवरून ईश्वरीला मारहाण करत असे. शारीरिक छळासोबतच मानसिक छळही सातत्याने होत होता. सासरच्यांकडूनही तिला वेळोवेळी त्रास दिला जात होता. परिस्थिती असह्य झाल्याने ईश्वरीने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. त्यांनी समजूत काढून संसार टिकवण्याचा सल्ला दिला, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

लग्नावेळी ईश्वरीच्या वडिलांनी मोठ्या थाटामाटात विवाह लावून दिला होता. (shocking incident) सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि विविध घरगुती वस्तू दिल्यानंतरही अजयची पैशांची मागणी थांबली नव्हती. उलट त्याने घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही सासऱ्यांनी भरावेत, असा दबाव तो पत्नीवर टाकत होता. दरम्यान, अत्यंत किरकोळ कारणावरूनही तिच्यावर अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. एका दिवशी भाजीत केस आढळल्याच्या कारणावरून अजयने ईश्वरीला बेदम मारहाण केली होती, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. पती आणि सासरच्यांकडून सुरू असलेल्या या सततच्या छळामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.

अखेर हा त्रास सहन न झाल्याने ईश्वरीने गळफास घेत आत्महत्या केली. (shocking incident) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, अजून किती ईश्वरी आणि वैष्णवी यांचा बळी जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *