पुण्यातील हडपसर परिसरातून सायबर फसवणुकीचा एक अतिशय (Cyber ​​thieves) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी तब्बल १२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (Cyber ​​thieves) पीडित व्यक्ती निवृत्त व्यावसायिक असून हडपसर भागात वास्तव्यास आहेत. जानेवारी महिन्यात त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. या मेसेजमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल असे आकर्षक आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला संशय न आल्याने त्यांनी संवाद सुरू ठेवला आणि त्यानंतर त्यांना “VIP Stock 24” नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.

या ग्रुपमधून (Cyber ​​thieves) सायबर चोरट्यांनी स्वतःला तज्ञ गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवत विविध योजनांची माहिती दिली. विश्वास बसावा यासाठी काही बनावट आकडे आणि नफ्याचे स्क्रीनशॉटही दाखवण्यात आले. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर ११ दिवसांत ५४ कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या मोठ्या नफ्याच्या लालसेपोटी संबंधित ज्येष्ठ नागरिकाने वेगवेगळ्या वेळेला आठ बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली.

सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वेळोवेळी (Cyber ​​thieves) पैसे भरत एकूण १२ कोटी ३१ लाख रुपये संबंधित खात्यांमध्ये जमा केले. मात्र, काही दिवसांनी संपर्क तुटल्याने आणि परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधित सायबर टोळीचा शोध घेतला जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा आकर्षक गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी योग्य पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *