अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णा मंदिर परिसरात (partially burnt) अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत झाला असून या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत तरुणीचे नाव रविना पवार (वय २४) असे असून तिची निर्घृण हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविनाची हत्या तिच्याच पतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. (partially burnt) सादीक शहा तसरीफ शहा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी ही कारवाई केली. प्रेमसंबंधातून रविना आणि सादीक यांचे लग्न झाले होते आणि ते वाशिम जिल्ह्यात वास्तव्यास होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रविनाने अकोल्यात एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, बाळाच्या जन्मानंतर अवघ्या आठ दिवसांतच तिची हत्या झाल्याने या घटनेने अधिकच संताप व्यक्त केला जात आहे. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे.

६ एप्रिलच्या रात्री दोघांमध्ये (partially burnt) तीव्र वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात सादीकने रविनाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ओळख पटू नये, यासाठीच हा प्रकार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आईची हत्या आणि वडील तुरुंगात गेल्याने अवघ्या आठ दिवसांचे बाळ पोरके झाले असून त्याच्या भवितव्याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात फसवणूक आणि पूर्वनियोजित कटाचा कोनही पोलिस तपासत आहेत.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *