सकाळच्या नाश्त्यात अनेकांना साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मेदुवडा, डोसा, इडली किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. साऊथ इंडियन पदार्थ बनवताना(breakfast) प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर केला जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा तांदूळ आणि डाळ भिजत घालायची राहून जाते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून डोसा बनवू शकता. ज्वारी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना तुम्ही आहारात ज्वारीच्या डोसाचे सेवन करू शकता. सकाळच्या वेळी सगळ्यांची खूप जास्त धावपळ असते. धावपळीच्या वेळी नेमकं नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक सकाळच्या नाश्ताकरत नाही. असे केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीचे डोसे बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:
ज्वारीचे पीठ
रवा
दही
मीठ
बेकिंग सोडा
कृती:
ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम,(breakfast) वाटीमध्ये रवा आणि दही टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
नंतर त्यात ज्वारीचे पीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ झाकून तसेच ठेवून द्या.
सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बेकिंग (breakfast) सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल टाकून पसरवून घ्या आणि डोसाचे गोलाकार मिश्रण टाकून डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ज्वारीचा डोसा. हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :
राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार….
रशियाचे 10,000 रुबल भारतात किती रुपयांचे ?
इंधनाविना 31 हजार 237 फूट उड्डाणकरण्याचा सौरविमानाचा जागतिक विक्रम