आरोपीने प्रथम त्याच्या भावाला मारले. त्यानंतर त्याने त्याच्या वहिनीशीच लग्न(married) केलं. त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र आता त्यानेच त्याच्या तीन मुली आणि पत्नीला नदीत फेकून दिलं. उत्तर प्रदेशच्या बहराइच येथून एक अत्यंत हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. तिथे एका इसमाने त्याच्या तीन मुलींना आणि बायकोला नदीत फेकून त्यांचा जीव घेतला. सुमन असं मृत महिलेचं नाव असून तिच्या 11, 6 आणि 3 वर्षांच्या मुलींचाही यात दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी ती महिला आणि मुलींच्या मृतदेहांचा शोधा घेण्याचा प्रयत्न केला, पण ते अद्याप सापडू शकलेले नाहीत. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील मोतीनगर पोलिस स्टेशन परिसरातील आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या सासूने पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली होती आणि जावयाने त्याची पत्नी व मुलींना गायब केल्याचा आरोप सासूने केला होता. पोलिसांनी तपास करून अनिरुद्ध या आरोपीला अटक केली असून त्याच्या चौकशीतून जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसही हादरलेत.

अनिरुद्धने कबुली दिली की, त्याने काही वर्षांपूर्वी त्याच्या भावाची हत्या केली होती. त्याची वहिनी खून प्रकरणात साक्षीदार होती, म्हणून तो तिच्यावर लग्न(married) करण्यासाठी आणि साक्ष न देण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, ती बहाणेबाजी करत होती, म्हणून तो तिला आणि तिच्या तीन निष्पाप मुलींना खेरी जिल्ह्यात घेऊन गेला. आणि त्याने त्या तिघींनाही शारदा नदीत फेकून दिलं आणि तो फरार झाला. सध्या पोलिसांनी अनिरुद्धविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि महिलेचे आणि तिच्या तीन मुलींचे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली आहे.

आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. 14 ऑगस्ट रोजी त्याने या सर्व हत्या केल्याचं सांगितलं. लखीमपूरमधील खमारिया येथे त्याने पत्नी आणि तीन मुलींना शारदा नदीत ढकलून दिले. आरोपीची सासू ही मोती नगर पोलिस स्टेशन परिसरातील चौधरी गावात राहते. तिने मंगळवारी मोती नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

तिचा जावई अनिरुद्ध, हा पकडिया दिवाणच्या रमाईपुरवा गावातील रहिवासी आहे, त्याने 14 ऑगस्ट रोजी तिची मुलगी सुमन आणि तिच्या तीन नातवंडांना बाईकवरून सोबत नेले होते, परंतु तिची मुलगी आणि नातवंडे त्यांच्या सासरच्या घरी पोहोचली नाहीत, तेव्हा तिने त्यांचा शोध सुरू केला असं महिलेने तक्रारीत नमूद केलं होतं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टीम स्थापन करून याप्रकरणी तपास सुरू केला.

यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला गयाघाट पुलावरून अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची कठोरपण चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितले की, 14 ऑगस्ट रोजी तो, त्याची पत्नी आणि तीन मुलींसह दुचाकीवरून लखीमपूरमधील खमारिया येथे गेला होता आणि तिथे त्याने शारदा नदीत ढकलून चौघींनाही ठार मारले.

चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, एका साथीदाराच्या मदतीने तो त्याची पत्नी आणि तीन मुलींना लखीमपूरमधील खमारिया येथे घेऊन गेला होता. त्यानंतर, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला घटनास्थळी नेले. तेथे, आरोपीच्या निर्देशानुसार,त्याच्या मृत पत्नी आणि मुलींचे झुडपात लपवलेले कपडे जप्त करण्यात आले. पोलिसांनी धाकट्या मुलीचे बूट आणि सायकलही जप्त केली. तिघांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, 2018 पासून आरोपीविरुद्ध त्याच्या भावाच्या हत्येचा खटला न्यायालयात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणात आरोपीची मोठी मुलगी आणि त्याची पत्नी प्रत्यक्षदर्शी होत्या. त्यामुळे या प्रकरणात शिक्षा टाळण्यासाठी आणि भावाची मालमत्ता मिळवण्यासाठी आरोपीने ही हत्या केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

“बॉलिवूडपासून गायब पण राणीप्रमाणे जगतेय सलमानची ही नायिका”

फेसबुकमुळे प्रेमात पडले, देवळात लग्नही ! सासरी गेल्यावर…

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *