परदेश प्रवास म्हणजे लाखो रुपये खर्च होतील असं बऱ्याच जणांना वाटतं.(abroad) पण खरं पाहता तसं नाही. योग्य नियोजन केलं तर तुम्ही 40 ते 50 हजारांच्या बजेटमध्येही परदेशात सहलीचा आनंद घेऊ शकता. गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांची परदेश प्रवासाकडे ओढ वाढली आहे. खास गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये विमान प्रवास, हॉटेल, जेवण आणि स्थानिक ट्रान्सपोर्ट यांचा खर्चही बसू शकतो. चला जाणून घेऊया कोणते देश या बजेटमध्ये फिरता येऊ शकतात.

१. नेपाळ – शेजारी देशात निसर्गसंपन्न सहल
नेपाळ हे भारतीय पर्यटकांसाठी नेहमीच स्वस्त आणि सोयीस्कर ठिकाण आहे.
बजेट : 35 ते 40 हजार
कालावधी : ४–५ दिवस
सर्वोत्तम वेळ : ऑक्टोबर ते मार्
हायलाइट्स : हिमालय पर्वतरांग, मंदिरे, स्थानिक संस्कृती
भारतातून जाण्यासाठी मोठा खर्च लागत नाही आणि इथे (abroad) हॉटेल्स व खाणं-पिणंही परवडणारं आहे.
२. कझाकस्तान – वेगळं पण बजेट-फ्रेंडली ठिकाण
कझाकस्तान हा कमी खर्चात भेट देता येणारा देश आहे.
बजेट : 40 हजारांपर्यंत
सर्वोत्तम वेळ : जून ते सप्टेंबर
विमानभाडे : दिल्लीहून ये-जा तिकीट अंदाजे 24 हजार
हायलाइट्स : विस्तीर्ण मैदानं, पर्वतरांग, स्थानिक इतिहास
विशेष म्हणजे येथे जाण्यासाठी व्हिसा प्रक्रिया गुंतागुंतीची नाही.

३. भूतान – शांती आणि निसर्ग एकत्र
भूतानला “हॅपीनेसचा देश” म्हटलं जातं.
बजेट : 35 ते 40 हजार
सर्वोत्तम वेळ : मार्च ते मे, सप्टेंबर ते नोव्हेंबर
हायलाइट्स : डोंगराळ भाग, मठ, शांत वातावरण
येथे जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही. शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर भूतान उत्तम पर्याय आहे.
४. व्हिएतनाम – स्वस्त चलन आणि सुंदर किनारे व्हिएतनाम आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो.
बजेट : 40 ते 50 हजार
सर्वोत्तम वेळ : मार्च ते मे, सप्टेंबर ते नोव्हेंबर
हायलाइट्स : समुद्रकिनारे, नदी प्रवास, ऐतिहासिक स्थळं
येथील चलन भारतीय रुपयांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे.(abroad) त्यामुळे 10 हजार रुपयांतही इथे मोठा खर्च करता येतो.
कमी बजेटमध्ये परदेश प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स
तिकीट आधीच बुक करा : किमान २–३ महिने आधी बुकिंग केल्यास तिकीट स्वस्त मिळतं. ऑफ-सीझनमध्ये प्रवास करा : गर्दीच्या हंगामाऐवजी शोल्डर सीझनमध्ये प्रवास स्वस्त पडतो.
ट्रॅव्हल अॅप्स वापरा : फ्लाइट्स आणि हॉटेल्सवर सवलती मिळू शकतात.
लोकल ट्रान्सपोर्ट वापरा : बस, ट्रेन, किंवा स्थानिक टॅक्सी वापरल्यास खर्च कमी होतो.
स्ट्रीट फूड चाखा : स्वादिष्ट आणि स्वस्त, दोन्ही मिळेल.
हेही वाचा :
2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट