बॉलिवूडमध्ये प्रेमसंबंध आणि ब्रेकअप हे कायम चर्चेचे विषय राहिलेले आहेत.(affairs) स्टार्स एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना सपोर्ट करतात आणि चाहत्यांसमोर त्यांचं नातं उघडपणे जगतात. पण काही वेळा अचानक ब्रेकअपच्या बातम्या समोर येतात आणि चाहत्यांना धक्का बसतो. अशाच एका प्रेमकथेत विकी कौशल आणि त्याची एक्स-गर्लफ्रेंड यांची चर्चा सर्वत्र रंगली होती.

विकी कौशलच्या प्रेमात हरलीन सेठी कतरिनाच्या आधी विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनीही कधीच त्यांचं नातं लपवलं नाही. एकमेकांच्या प्रोजेक्ट्सना सपोर्ट करणे, (affairs)प्रमोशनला उपस्थित राहणे, अशा अनेक गोष्टींमधून त्यांच्या प्रेमकथेची चर्चा होत असे. हरलीनला विकी पहिल्यांदा एका पार्टीत भेटला होता आणि तेथूनच त्यांची जवळीक वाढली. विकी अनेकदा म्हणायचा की तो एका सुंदर मुलीसोबत रिलेशनमध्ये आहे – आणि तो हावभावांमधून हरलीनकडे बोट दाखवायचा.

सार्वजनिक पाठिंबा जेव्हा हरलीनचा वेब शो ब्रोकन बट ब्युटीफुल आला, तेव्हा विकीने उघडपणे तिच्या कामाचं कौतुक केलं होतं. (affairs)त्याचप्रमाणे उरी: द सर्जिकल स्ट्राईक दरम्यान हरलीन विकीच्या चित्रपटासाठी उत्साहाने प्रमोशन करत होती. दोघे जण एकत्र वेळ घालवत असल्यामुळे त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरू होती.

ब्रेकअपची वेळ मात्र 2019 मध्ये अचानक ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. त्याच काळात विकी आणि कतरिना कैफ यांच्यातील जवळिकीच्या अफवा समोर येऊ लागल्या. त्यामुळे कतरिनाच्या एन्ट्रीमुळे विकी-हरलीनचं नातं दुरावलं, असं म्हटलं जाऊ लागलं.

हरलीनची मानसिक अवस्था ब्रेकअपनंतर हरलीन खूप निराश झाली. तिला डिप्रेशनचा सामना करावा लागला आणि बराच काळ ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकली नाही. मात्र नंतर तिने स्वतःला सावरलं. आज ती पुन्हा तिच्या करिअरमध्ये सक्रिय आहे, वेब प्रोजेक्ट्समध्ये झळकते. पण वैयक्तिक आयुष्यात ती अजूनही सिंगल आहे. विकी कौशलचं वैवाहिक जीवन विकी कौशलने मात्र ब्रेकअपनंतर या विषयावर कधीच भाष्य केलं नाही. आज तो कतरिना कैफसोबत सुखी वैवाहिक जीवन जगतोय. पण त्याच्या भूतकाळातील हरलीनसोबतचं प्रेम आजही चर्चेचा विषय ठरतं.

हेही वाचा :

2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *