राज्यासह देशभरात अल्पवयीन तरुणींवरील (girl)अत्याचाराच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे तरुणींमध्ये रस्त्याने एकटे जाताना भिती निर्माण होत आहे. पोलिसही तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलत आहेत. मात्र तरीही अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील बिशरतगंज भागात ही कारवाई केली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सहाय्यक जिल्हा सरकारी वकील प्रवीण कुमार सक्सेना म्हणाले की, २० ऑगस्ट रोजी, विशेष पोक्सो न्यायाधीश कुमार मयंक यांनी २१ वर्षीय विकास यादवला १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याबद्दल शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला २८,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.ही घटना १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली. जेव्हा विकासने मुलीचे अपहरण केले, तिला दिल्लीला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बिशरतगंज पोलिस ठाण्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशात दररोज अल्पवयीन मुलींवरील (girl)बलात्काराचे प्रकार उघडकीस येत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, असे दिसून येते की आरोपी हा कुटुंबातील जवळचा व्यक्ती असतो ज्यावर निष्पाप व्यक्तीला सर्वात जास्त विश्वास असतो. अशा परिस्थितीत, गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे हे प्रत्येक वेळी महत्त्वाचे असते.

गेल्या काही दिवसाखाली एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २०१९ साली फिर्यादी त्यावेळी केवळ १९ वर्षाची होती. तेव्हापासून हा अत्याचार सुरु होता. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा.

याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

हेही वाचा :

GST प्रणालीतील बदलांनंतर ‘या’ वस्तू होणार स्वस्त

यड्रावमध्ये कामगाराचा खून?

शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *