स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. ही घोषणा होती जीएसटी करप्रणालीसंदर्भात. दिवाळीच्या तोंडावरच केंद्र सरकार नवी जीएसटी(GST) रतचना लागू करण्यासाठी सज्ज असून त्याअंतर्गत बऱ्याच गोष्टींचे सध्याचे दर बदलणार असून, काही गोष्टी स्वस्तसुद्धा होणार आहेत.

केंद्राकडून देशात सध्या लागू असणारी चारस्तरीय जीएसटी प्रणाली अधिक सुटसुटीत करत दोन टप्प्यांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गुरुवारी या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा-दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरेदीचे बेत आखणाऱ्यांसाठी दसरा दिवाळीचा मुहूर्त उत्तम असेल हेच खरं.

सध्या 5, 12, 18 आणि 28 टक्के या चार टप्प्यांमध्ये जीएसटी(GST) आकारला जातो. त्याऐवजी आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच टप्पे लागू असतील. ज्यामुळं यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर येत्या काळात कमी होणार आहेत. उलटपक्षी अतिचैनीच्या (Ultra Luxury) आणि ‘घातक’ श्रेणीत (सिन गुइस) मोडणाऱ्या वस्तूंवर 40 टक्के कर लावला जाणार आहे.

एकिकडे केंद्राच्या या निर्णयानं सामान्यांना दिलासा मिळणार असला तरीही या निर्णयामुळं नेमका किती महसूल बुडणार आणि असं झाल्यास हा तोटा नेमका कसा भरून काढणार? यासाठी पर्याय काय? याच्या स्पष्टोक्तीची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान नव्या प्रणालीसाठीच्या तरतुदींवर मंत्री समुहानं केलेल्या शिफारसी आता अंतिम निर्णयासाठी उच्चस्तरीय जीएसटी परिषदेकडे पाठविण्यात येतील. परिषदेच्या मंजुरीनंतरच ही नवीन जीएसटी प्रणाली लागू होईल. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे.

12 ऐवजी 5 टक्के जीएसटी प्रणालीत समावेश होऊ शकणाऱ्या गोष्टी अर्थात स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंमध्ये सुकामेवा, बँडेड नमकीन, टूथपेस्ट, टूथ पावडर, साबण, हेअर ऑइल, सामान्य अँटिबायोटिक्स यांचा समावेश आहे. याशिवाय पेनकिलर औषधं, सोबतच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचेही दर कमी होतील असं सांगण्यात येत आहे. स्नॅक्स, फ्रोजन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल आणि कॉम्प्युटर, शिवणकामाचे मशीन, प्रेशर कुकर, गिझर, विजेशिवाय चालणारे पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लिनर यांच्याही किमती येत्या काळात स्वस्त होणार असल्याची चिन्हं आहेत.

स्वस्ताईचा परिणाम 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, 500 ते 1000 रुपयांच्या किमतीचे बूट, बहुतांश आजारांवरील लसी, एचआयव्ही/टीबी डायग्नोस्टिक किट, सायकल आणि भांडी, कंपास पेटी, नकाशे, ग्लेज्ड टाइल्स, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतुकीची वाहने, शेतीची यंत्रसामग्री, सोलर वॉटर हिटर.

चॉकलेट, रेडी-मिक्स काँक्रीट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, खासगी विमानं, कॉफी कॉन्संट्रेट, प्लास्टिक उत्पादने, रबरचे टायर, सिमेंट, सौंदर्य प्रसाधनं, अॅल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस.

केंद्र सरकारने चारस्तरीय जीएसटी प्रणाली (5%, 12%, 18%, 28%) ऐवजी दोन टप्प्यांची सुटसुटीत जीएसटी प्रणाली (5% आणि 18%) लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याशिवाय, अतिचैनीच्या आणि ‘घातक’ वस्तूंवर 40% कर लावला जाणार आहे.

हा प्रस्ताव उच्चस्तरीय जीएसटी परिषदेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. परिषदेच्या मंजुरीनंतर ही प्रणाली दसरा-दिवाळी 2025 च्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे.अतिचैनीच्या आणि ‘घातक’ श्रेणीतील वस्तूंवर 40% जीएसटी लागू होईल.

हेही वाचा :

शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…

हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप Video Viral

ब्रेकअपनंतरचा थरार! 15,500 फूटांवरून स्कायडायव्हरची उडी ठरली जीवघेणी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *