यड्रावमधील एका औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यात लोखंडी (Iron)साहित्य पडल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे, तरी रुग्णालयात किंवा पोलिसांत नोंद न करता मृतदेह कर्नाटकात नेऊन अंत्यसंस्कार केला गेला.

बुधवारी मुसळधार पावसामुळे कारखान्यात बांधकाम सुरू असताना लोखंडी(Iron) कैची पडल्याने हा अपघात झाला असे सांगण्यात आले. कामगाराला उपचारांसाठी इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, रुग्णालयात मृत्यूची नोंद न करता कामगाराच्या मृत्यूची माहिती कायदेशीरपणे नोंदवण्यात आली नाही.
या घटनेत काही वर्षांपूर्वी घडलेल्या सारख्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांमध्ये खून असल्याचे संशय अधिकच बळावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप काही कारवाई न करता हात झटकल्याचे दिसत आहे.
कारखाना व्यवस्थापन व नातेवाईकांनी मृतदेह तातडीने कर्नाटकमधील मूळ गावी हलवला आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अंत्यसंस्कार केले. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, मात्र कोणतीही तक्रार न असल्याचे कारण सांगून पुढील माहिती देण्यास नकार दिला.ही घटना परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरली असून, आता पोलिस आणि प्रशासनाची कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…
हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप Video Viral
ब्रेकअपनंतरचा थरार! 15,500 फूटांवरून स्कायडायव्हरची उडी ठरली जीवघेणी