प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगाचे लक्ष असते.(Earthquake) आजवर त्यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली आहे. जुलै महिन्यात काही देशांमध्ये भूकंप आणि त्सुनामी येणार असे बाबा वेंगा यांनी म्हटले होते. आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी होती. इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी येण्याचा धोका वाढला आहे. USGS नुसार, या भूकंपाची खोली 10.8 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, हा भूकंप भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 46 मिनिटे 22 सेकंदांनी आला.

अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण नुसार, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार ड्रेक पॅसेज क्षेत्रात एक जास्त तिव्रतेचा भूकंप आला. त्याची तीव्रता 8 वरून कमी करून 7.5 केली गेली. तसेच, अमेरिकन त्सूनामी येण्याची शक्यता जाणवत नसल्याचे सांगितले आहे. साधारणपणे इतक्या तीव्र धक्क्यांनंतर त्सूनामीचा इशारा जारी केला जातो. (Earthquake)फक्त चिलीमध्ये त्सूनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे.

यापूर्वी 30 जुलैच्या सकाळी, रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक भूकंप आला, ज्यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सूनामीच्या लाटा उसळल्या आणि पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास किंवा उंच ठिकाणी जाण्यास सांगितले गेले. 8.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी हवाई, उत्तर आणि मध्य अमेरिका आणि न्यूझीलंडच्या दिशेने दक्षिणेकडील पॅसिफिक बेटांमध्ये चेतावणी जारी केली होती.(Earthquake)बाबा वेंगा यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनेक देशांमध्ये त्सुनामी आणि भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
GST प्रणालीतील बदलांनंतर ‘या’ वस्तू होणार स्वस्त
यड्रावमध्ये कामगाराचा खून?
शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…