मंगळ ग्रहाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पृथ्वीच्या अगदी शेजारी असलेल्या या लालभडक ग्रहावर जीवन आहे का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून संशोधकांना पडतोय. आता नासाच्या (NASA)रोव्हरने केलेल्या नव्या शोधामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

मंगळावर तैनात क्युरिऑसिटी रोव्हरने डायनासोरच्या अंड्यासारखी गुळगुळीत, गोलाकार रचना शोधली आहे. या रचनेचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकार – काही रचना दगडाइतक्या लहान तर काही फुटबॉलसारख्या मोठ्या आहेत. पृथ्वीवर अशा रचना ज्वालामुखी प्रक्रियेतून तयार होतात. त्यामुळे या रचनेत प्राचीन जीवनाच्या खुणा लपलेल्या असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
ही रचना प्रत्यक्षात डायनासोरची अंडी नसली तरी तिचा आकार आणि बनावट यामुळे उत्सुकता वाढली आहे. मंगळाच्या भूगर्भीय इतिहासासोबतच तिथल्या संभाव्य जैविक इतिहासाचा शोध घेण्यासाठी संशोधनाला नवा वेग मिळणार आहे.
नासाचं (NASA)क्युरिऑसिटी रोव्हर हाय रिझोल्यूशन कॅमेरे आणि लेझर स्पेक्ट्रोस्कोपीसारख्या आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. हे यंत्र आसपासच्या वस्तूंचं फोटो घेतं आणि त्यांचं रासायनिक विश्लेषण करतं. यामुळे मंगळावरील या रहस्यमय रचनेचं मूळ शोधण्यात मदत होणार आहे.

मंगळाचं वातावरण अत्यंत कठीण आहे – कमी तापमान, धुळीचं प्रचंड वादळ आणि खडकाळ पृष्ठभाग. अशा परिस्थितीत रोव्हरचं काम करणं सोपं नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर नासाने हे आव्हान पेललं आहे.जर मंगळावर प्राचीन जीवनाच्या खुणा प्रत्यक्षात सापडल्या, तर मानवजातीच्या अवकाश संशोधनाला नवं वळण मिळणार आहे.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण…