ऑपरेशन सिंदूरमध्ये शानदार कामगिरी करून पाकिस्तानच्या लक्ष्यांचा (confidence) नेस्तनाबूत केलेल्या रॅम्पेज मिसाईलवर भारतीय वायूसेना आता अधिक विश्वास दाखवत आहे. त्यामुळे भारतीय वायूसेना इस्राईलकडून या अत्याधुनिक हवेतून-भूमीवर मारा करणाऱ्या रॅम्पेज मिसाईलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्याच्या तयारीत आहे.
संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय वायूसेनेत हे मिसाईल हाय-स्पीड लो ड्रॅग- मार्क 2 या नावाने समाविष्ट करण्यात आले आहे. हे मिसाईल आधीपासूनच भारताच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये म्हणजेच सु-30 MKI, (confidence)मिग-29 आणि जग्वार यामध्ये बसवण्यात आले आहे. रॅम्पेज हे इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ने बनवलेले अत्याधुनिक एअर-टू-ग्राउंड मिसाईल आहे.

याच्या काही प्रमुख वैशिष्ट्ये :
रेंज: 150 ते 250 किमी अंतरावरील लक्ष्यावर अचूक मारा करू शकते.
स्पीड: सुपरसॉनिक मिसाईल, जी मॅक 2 (ध्वनीच्या दुप्पट वेगाने) उडते.
अचूकता: INS/GPS नेव्हिगेशन सिस्टीम आणि इलेक्ट्रो-ऑप्टीकल / इन्फ्रारेड सेंसरच्या साहाय्याने अचूक लक्ष्यभेद.
टार्गेट: भूमिगत बंकर, रडार स्टेशन, कमांड सेंटर आणि शत्रूची मजबूत ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी खास डिझाईन.
भारतीय वायूसेनेत रॅम्पेजचा वापर भारतीय वायूसेनेने रॅम्पेज मिसाईलचं रशियन बनावटीच्या अनेक फायटर जेटमध्ये यशस्वी इंटिग्रेशन केलं आहे :
सु-30 MKI: भारताचे सर्वात ताकदवान लढाऊ विमान. या विमानातून ब्रह्मोस आणि आता रॅम्पेजसारखी मिसाईल डागता येणार आहेत.
मिग-29: वेगवान आणि चपळ फायटर जेट, जे रॅम्पेजमुळे आणखी घातक होणार आहे.
जग्वार: जुने पण विश्वासार्ह विमान, ज्याला आता अपग्रेडेड रॅम्पेज क्षमतांचा लाभ मिळाला आहे.
मिग-29K (नौदलासाठी): विमानवाहू नौकांवर तैनात असलेले हे विमानही रॅम्पेजने सुसज्ज होणार.
तेजस (भविष्यात): स्वदेशी तेजस लढाऊ विमानातही रॅम्पेज बसवण्याची योजना.
मेगा ऑर्डर आणि ‘मेक इन इंडिया’ ऑपरेशन सिंदूरमध्ये रॅम्पेज मिसाईलच्या यशस्वी कामगिरीनंतर, भारतीय वायूसेनेने त्याचे मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन केले आहे. ही खरेदी फास्ट-ट्रॅक ऑर्डर अंतर्गत केली जात आहे, म्हणजेच कोणत्याही विलंबाशिवाय त्वरित डिलिव्हरी मिळेल. महत्वाचं म्हणजे, भारत सरकार या मिसाईलचं स्थानिक उत्पादन (मेक इन इंडिया) सुरू करण्याच्या तयारीत आहे.

इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यात 2023 मध्ये झालेल्या करारानुसार भारतातच रॅम्पेज मिसाईलचे उत्पादन सुरू होऊ शकते. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढेल. उत्पादन खर्च कमी होईल. भविष्यात भारत या मिसाईलचा एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो.
धोरणात्मक महत्त्व रॅम्पेज मिसाईल भारतीय वायूसेनेच्या क्षमतेत गेम चेंजर ठरणार आहे. पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रूराष्ट्रांकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांना उत्तर देण्यासाठी,(confidence) दूरवरच्या आणि मजबूत लक्ष्यांवर तात्काळ व अचूक हल्ला करण्याची क्षमता भारताकडे असेल. ऑपरेशन सिंदूरमधील यशानंतर रॅम्पेज मिसाईलला वायूसेनेत मिळालेला मान हेच दर्शवते की, भारत आता भविष्यातील युद्धांसाठी अधिक प्रगत आणि सज्ज होत आहे.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण… Edit