भारतीय संघाचे माजी खेळाडू (player)व प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनायाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि विराट कोहली यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे.हा व्हिडीओ प्रत्यक्षात अनाया बांगरच्या जेंडर ट्रान्सफॉर्मेशनपूर्वीचा आहे. त्यावेळी ती आर्यन बांगर या नावाने ओळखली जात होती. व्हिडीओमध्ये विराट कोहली आर्यनला फलंदाजीसंदर्भात टिप्स देताना दिसतो. अनायाने हा व्हिडीओ शेअर करत भावनिक कॅप्शन लिहिले आहे “त्यावेळी एक लहान मुलगा विराटकडून टिप्स ऐकत होता. आज भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यासाठी मी लढत आहे. काही स्वप्न कधीच बदलत नाहीत.”

अनाया बांगर क्रिकेटबद्दल प्रचंड उत्साही असून तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात ती नेट्समध्ये बॅटिंग करताना दिसते. मुलाखतीत तिने खुलासा केला होता की, जेव्हा तिचे वडील संजय बांगर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा ती विराटला अनेकदा भेटली होती. विराट कोहली नेहमी मजेशीर स्वभावाचा असायचा, पण फलंदाजीच्या सरावावेळी तो अत्यंत गंभीरपणे प्रॅक्टिस करायचा, असे अनायाने सांगितले(player).
पूर्वी डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला आर्यन बांगर काही काळापूर्वी जेंडर चेंज ऑपरेशन करून अनाया बांगर बनला. आपल्या या प्रवासाबद्दल अनाया अनेकदा मोकळेपणाने बोलते आणि संबंधित व्हिडीओही शेअर करते.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण…