सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर(engagement rings) याचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. त्यानंतर आता सचिनची लेक सारा तेंडुलकरने असं काही म्हटलंय ज्याची चर्चा रंगली आहे.

भारताचा अभिमान, स्टार आणि माजी खेळाडू, क्रिकेटचा देव, भारतरत्न अशी अनेक विशेषणं सचिन तेंडुलकर याची ओळख करुन देण्यास कमी पडतील. सचिनने क्रिकेट कारकीर्दीत(engagement rings) असंख्य विक्रम केले जे त्याच्या निवृत्तीच्या दशकानंतरही कायम आहेत. सचिनने कसोटी, वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये विक्रमी धावा केल्या. इतकंच काय तर सचिनने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जून तेंडुलकर यानेही करियर म्हणून क्रिकेटलाच पसंती दिली. अर्जूनने गेल्या काही वर्षात क्रिकेटच्या जोरावर सचिनचा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्या स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. ऑलराउंडर असलेल्या अर्जुनने मुंबईकडून पदार्पण केलं. मात्र तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतोय. तसेच अर्जून आयपीएलमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो.
अर्जून आणि उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक यांचा अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. यानंतर अर्जून आणि सानिया या दोघांची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. आता अर्जूनच्या साखरपुड्यानंतर मोठी बहिण आणि सचिनची लेक साराने एका मुलाखतीत केलेल्या भाष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. साराने मनात असलेलं सर्व काही सांगून टाकलं. साराने नक्की काय म्हटलं आणि कशाबद्दल म्हटलं? हे जाणून घेऊयात.मी क्रिकेटकडे कधीच करियर म्हणून पाहिलं नाही, असं साराने म्हटलं.
साराने काय म्हटलं?
“मी गल्ली क्रिकेट खेळलेय. मात्र मी क्रिकेटमध्येच करियर करायचं, असा कधीच विचार केला नाही. माझा भाऊ क्रिकेटमध्ये फार चांगला आहे”, असं म्हणत साराने क्रिकेटबद्दल जे मनात होतं ते सांगितलं. साराने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटबाबत ही प्रतिक्रिया दिली.
साराने या मुलाखतीत ऑस्ट्रेलियातील लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “मला चांगलं आठवतंय की आम्ही सिडनीत नववर्षातील पहिल्या दिवशी संध्याकाळ साजरी करत होतो. आम्ही दर 4 वर्षांनी तिथे जायचो. संपूर्ण टीमसह आम्ही नववर्षातील पहिल्या संध्याकाळी एका बोटीवर होतो. मी हे कधीच विसरू शकत नाही”, असं म्हणत साराने ऑस्ट्रेलियातील आठवण सांगितली.
साराची वडिलांच्या कारकीर्दीतील आठवण
साराने तिला तिच्या वडिलांची कोणती मॅच सर्वात जास्त आठवते याबाबतही सांगितलं. ” मला कोणता एक सामना निवडायचा असेल तर मी वडिलांचा वानखेडेत वेस्ट इंडिज विरुद्ध झालेला निरोप सामना निवडेन. तेव्हा हे इतकं महत्त्वाचे का आहे हे समजून घेण्याइतपत मी मोठी होते. तो दिवसही मी कधीच विसरु शकणार नाही”, अशी आठवणही साराने सांगितली.
हेही वाचा :
‘ही’ 5 सर्वोत्तम ठिकाणं, सप्टेंबरचा फिरण्याचा प्लॅन करण्यापूर्वी जाणून घ्या
दक्षिण आफ्रिका मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासमोर रोखण्याचं आव्हान
निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा संदेश देणारा विशेष दिवस