भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने 2025 साली क्रिकेट प्रशासनासाठी 7 महत्त्वाच्या (administration) रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट संघ निवडीशी संबंधित आहेत. बीसीसीआयसोबत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, परंतु यासाठी काही कडक पात्रता निकष लागू आहेत.
रिक्त पदांची माहिती वरिष्ठ पुरुष संघासाठी राष्ट्रीय निवडकर्ते – 2 पदे
कामाचे स्वरूप: भारताच्या पुरुष कसोटी, वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय संघाची निवड करणे.

पात्रता:
किमान 7 कसोटी सामने खेळलेले असावे.
30 प्रथम श्रेणी किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे.
निवृत्त झालेल्या 5 वर्षांपूर्वीचे खेळाडू.
बीसीसीआय क्रिकेट समितीचे सदस्य नसावे.
महिला राष्ट्रीय निवडकर्ते – 4 पदे
कामाचे स्वरूप: महिला संघाच्या कसोटी, वनडे व टी20 सामन्यांसाठी संघ निवडणे; (administration)प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि इतर व्यवस्थापन जबाबदाऱ्या सांभाळणे.

पात्रता:
भारतीय महिला संघाकडून खेळलेले असावे.
5 वर्षांपूर्वी निवृत्त झालेली असावी.
5 वर्षे बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावा.
ज्युनियर पुरुष संघ (U-22) निवड समिती सदस्य – 1 पद
कामाचे स्वरूप: 22 वर्षाखालील पुरुष संघाचे निवड, दौरे आणि स्पर्धांसाठी संघाची जबाबदारी.
पात्रता:
किमान 25 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.
5 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले असावे.
बीसीसीआय क्रिकेट समितीचे सदस्य नसावे.
पगार व फायदे
वरिष्ठ संघ निवड समिती सदस्य: सुमारे ₹90 लाख वार्षिक पगार.
ज्युनियर क्रिकेट समिती सदस्य: ₹30 लाख वार्षिक पगार.
याशिवाय, या पदांसाठी निवड झालेल्यांना बीसीसीआयकडून मुलाखतीसाठी आमंत्रण दिले जाईल.
अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख
अंतिम तारीख: 10 सप्टेंबर 2025
वेळ: संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
अर्ज करण्याचे माध्यम: बीसीसीआयची अधिकृत वेबसाइट
ही संधी क्रिकेट प्रशासनात उच्च पातळीवर काम करण्याची (administration)आणि राष्ट्रीय संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याची आहे. उमेदवारांनी पात्रता निकष काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण…