२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील(organized) ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये Navabharat- Navarashtra Maharashtra 1st Conclave आयोजित करण्यात येत आहे.

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे बदलते चित्र आता केवळ योजना आणि घोषणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता जनतेचा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचणार आहे.(organized) तेही नवभारत आणि नवराष्ट्र एमएच पहिला कॉन्क्लेव्ह 2025 च्या माध्यमातून, जिथे राज्याच्या प्रगती आणि आव्हानांवर एक विशेष पॅनेल चर्चा होईल. या व्यासपीठावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर जनतेच्या प्रश्नांना सामोरे जातील आणि त्यांची थेट उत्तरे देतील.

केव्हा आणि कुठे:
२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे Navabharat-Navarashtra Maharashtra 1st Conclave, 2025 आयोजित करण्यात आला आहे.

या कॉन्क्लेव्हचे वैशिष्टय काय?
महाराष्ट्राच्या १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपवर सखोल चर्चा.
पॅनेल चर्चेत शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा.
जनतेचे प्रश्न थेट नेतृत्वासमोर मांडण्याची संधी.
विकासाची दिशा ठरवण्यात सामान्य नागरिकाची सक्रिय भूमिका.

कोणची असेल प्रमुख उपस्थिती?
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

गेस्ट ऑफ ऑनर म्हणून महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सापकल, टुनवाल ई-मोटर्स लिमिटेडचे सीएमडी झुमरमल टुनवाल, सुहाना स्पायसेसचे संचालक व द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, तसेच महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल उपस्थित राहतील.

विशेष अतिथी म्हणून एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य मत्स्य व मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील , पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाले, तसेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त अनमोल सागर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

जनतेचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारला जाणार
राज्याच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांवर जनतेने त्यांचे प्रश्न आणि सूचना आधीच पाठवल्या आहेत. सर्वोत्तम प्रश्न निवडले गेले आहेत आणि निवडलेले प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना MH 1st Conclave 2025 येथे विचारले जातील.

हेही वाचा :

 जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ?

10 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह कोसळणार पाऊस….

पॅसेंजर ट्रेन की मालगाडी, कोणत्या लोको पायलटचा पगार जास्त?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *