उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवरील लौकाही गावात(village) धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मौलानावर जादूटोणा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली मुलींशी गैरकृत्ये करण्याचा आरोप झाला आहे.

सुरुवातीला गावातील (village)अनेक महिला समस्या सोडवण्यासाठी आणि तंत्र-मंत्र करून उपाय मिळवण्यासाठी या मौलानाकडे जात होत्या. मात्र घरात जाऊन बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. हे प्रकरण सुरूच असताना अचानक एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मौलाना जादूटोण्याच्या बहाण्याने मुलींना स्पर्श करताना आणि अश्लील कृत्ये करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर येताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत म्हटले की, धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मुलींना बळी बनवणे हे अमानुष कृत्य आहे. त्यांनी मौलानाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

मोतीपूर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. आरोपी मौलानाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सध्या गावात भीती आणि रागाचे वातावरण असून, स्थानिक लोक याप्रकरणात न्याय मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *