आंघोळीनंतर या चुका करू नका; (bathing)आरोग्य आणि वास्तुशास्त्र दोन्हीवर होऊ शकतो नकारात्मक परिणाम आंघोळ ही केवळ शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया नाही, तर दिवस ताजेतवाने करण्यासाठी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते आंघोळीनंतर केल्या जाणाऱ्या काही छोट्या चुका आयुष्यात आरोग्याच्या समस्या आणि वास्तुशास्त्रानुसार अपशकुन घडवू शकतात.
आंघोळीनंतर होणाऱ्या सर्वसामान्य चुका: बाथरूममध्ये पाणी साचणे आंघोळीनंतर जर बाथरूममध्ये सांडपाणी साचले तर ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. असे झाल्यास राहु-केतू नाराज होतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

रिकामी बादली ठेवणे आंघोळीनंतर बाथरूममध्ये बादली पूर्णपणे रिकामी ठेवू नये. (bathing)वास्तुशास्त्रानुसार रिकामी बादलीमुळे घरात आर्थिक संकट आणि धनहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बादलीत थोडे पाणी ठेवणे शुभ मानले जाते.
ओले कपडे ठेवणे आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे टांगणे किंवा ठेवणे टाळावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तुशास्त्र सांगते. कुंकू लावण्यात घाई करणे आंघोळीनंतर लगेच कपाळावर कुंकू लावू नये. शरीर आणि मन स्थिर झाल्यानंतरच ते लावावे, असे मानले जाते.

बाथरूममध्ये ऊर्जा संतुलन वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हे नकारात्मक ऊर्जेचे(bathing) केंद्र मानले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम कमी करण्यासाठी बाथरूममधील बादल्या नेहमी पाण्याने भरलेल्या ठेवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?