गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच आता (preparations)या उत्सवासाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. गावाच्या, प्रामुख्याने कोकणाच्या दिशेनं निघणाऱ्या अनेकांनाच आता वाढलेल्या पर्जन्यमानाचाही सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्यानं नाशिक भागाला पाऊस झोडपणार आहे. सोमवार 25 ऑगस्ट 2025 पासून मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली, उपनगरांमध्येसुद्धा चित्र काही वेगळं नव्हतं.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं उत्तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. (preparations)बंगालच्या उपसागरात 26 ऑगस्टपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा नव्यानं सक्रिय होण्याचे संकेत असून, त्यामुळं मान्सूनचा प्रभाव कमी झाला असला तरीही या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा केंद्रीय हवामान विभागानं वर्तवला असून, अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली असून महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (preparations)पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्यामुळं नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका
बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल
चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज