आज आम्ही तुम्हाला अशा एका सिरियल किलरबद्दल सांगणार आहोत, (horrific)ज्याने सुमारे 7 वर्षांत 30 मुलींवर बलात्कार केला आणि त्यांची हत्या केली. चला, तुम्हाला या सिरियल रेपिस्ट आणि किलरच्या भयानक कथेबद्दल जाणून घेऊया… मला प्रेताशी शारिरीक संबंध ठेवायला मजा येते; 30 मुलींवर अत्याचार करणारा हैवान कसा पकडला गेला?
देशात सतत मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. दिल्लीमध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले होते. सुमारे 30 मुलींच्या आयुष्याशी खेळणारा सिरियल किलर रविंदर कुमारने पहिल्या मुलीला आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी बळी बनवले तेव्हा तो अल्पवयीन होता. रविंदरने 7 वर्षांत 30 मुलींवर बलात्कार केला आणि त्यांना ठार मारले. त्याने बहुतांश बलात्कार दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात केले. आता हा हैवान कसा पकडला गेला चला जाणून घेऊया…

गायब होणाऱ्या मुलांचे पालक आणि पोलिसांचा निष्काळजीपणा गायब होणाऱ्या मुलींचे मजुरी करणारे पालक एकदा पोलिसांकडे तक्रार घेऊन जात, पण नंतर त्याचा पाठपुरावा करत नसत. याचा फायदा रविंदर घ्यायचा. त्याने काही मुलींना वासनेचे बळी बनवून पुरले, तर काहींना नाल्यात फेकून दिले.
वर्षे निघून गेली आणि त्याच्या क्रूर कृत्यांचे बळी वाढत गेले, पण कोणालाच याची जाणीव झाली नाही.(horrific) पोलिसा तपासाच्या माध्यातून रविंदर कुमारपर्यंत पोहोचले. त्याला अटक झाली. चौकशीदरम्यान जे खुलासे झाले, त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
रविंदरच्या निशाण्यावर मुख्यतः 6 ते 12 वर्षे वयाच्या मुली होत्या. जेव्हा त्याला पहिल्यांदा पकडले गेले, तेव्हा फक्त एका हत्येचा तपास सुरू होता. पण रविंदरने स्वतः तोंड उघडून भयानक सत्य उघड केले. तो म्हणाला, “मी मुलांचे अपहरण केले, बलात्कार केला आणि मग त्यांना ठार मारले. अगदी प्रेतावरही बलात्कार केला. मला यात मजा यायची.”
रविंदर कसा बनला रेपिस्ट 2008 मध्ये रविंदर उत्तर प्रदेशच्या कासगंजमधून दिल्लीला आला होता. तेव्हा त्याचे वय 18 वर्षे होते. त्याचे वडील प्लंबरचे काम करायचे आणि आई लोकांच्या घरात जेवण बनवणे आणि साफसफाईचे काम करायची. दिल्लीत आल्यानंतर तो दारू आणि ड्रग्सच्या आहारी गेला होता.

त्याचबरोबर त्याला पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले. त्याने सांगितले की, तो रोज संध्याकाळी दारू प्यायचा किंवा ड्रग्स घ्यायचा आणि मग आपले टार्गेट म्हणजेच अल्पवयीन मुलांच्या शोधात निघायचा.(horrific)यासाठी तो एका दिवसात 40 किमीपर्यंत पायी चालायचाही. सर्वप्रथम त्याने 2008 मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पहिल्यांदा गुन्हा करून पकडले न गेल्याने त्याचे धाडस वाढले. मग हा त्याचा रोजचा क्रम बनला.
चॉकलेटचे आमिष, मग… रविंदरने सांगितले की, तो मुलांना जवळ बोलावण्यासाठी 10 रुपयांची नोट किंवा चॉकलेटचे आमिष दाखवायचा. मग त्यांना पकडून सुनसान ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. दोषीने आपल्या जबाबात सांगितले की, त्याने 7 वर्षांत 6 ते 12 वर्षे वयाच्या मुलांवर बलात्कार केले.
2014 मध्ये पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली, पण पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने त्याला सोडले. 2015 मध्ये 6 वर्षांच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात दिल्लीच्या रोहिणीतून त्याला पुन्हा पकडले गेले. यावेळी पोलिसांकडे पक्के पुरावे होते. मजबूत चार्जशीटनंतर मे 2023 मध्ये न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
न्यायालयाचा निर्णय आता दिल्लीच्या न्यायालयाने शनिवारी या क्रूर राक्षसाला पुन्हा एकदा दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सांगितले की, अभियोजन पक्षाने पक्के पुरावे सादर केले आहेत आणि आरोपीच्या सफाईत काहीही तथ्य नाही. आता त्याला 28 ऑगस्ट रोजी सजा सुनावली जाईल.
न्यायालयाने रविंदर कुमारला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 363 (अपहरण) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले, “त्याचा गुन्हा अमानुष आणि क्रूर आहे. समाजाला, न्यायालयाला किंवा कायद्याला त्याच्यासाठी कोणतीही सौम्यता दाखवण्याची गरज नाही.”
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका
बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल
चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज