जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने केलेल्या एका वक्तव्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.(retire)38 वर्षांच्या मेस्सीने हे स्पष्ट केलंय की तो सध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मेस्सीने इशारा केला की 4 सप्टेंबर रोजी ब्यूनस आयर्सच्या एस्टादियो मोन्यूमेंटल स्टेडियममध्ये वेनेजुएला विरुद्ध होणार वर्ल्ड कप क्वालिफायर सामना हा कदाचित त्याचा शेवटचा होम सामना होऊ शकतो.

Apple TV ला देण्यात आलेल्या एका मुलाखतीत मेस्सीने म्हटले की, ‘हा माझ्यासाठी एक खूपच खास सामना असेल. हा माझ्यासाठी माझा शेवटचा क्वालिफायर सामना होऊ शकतो. मला नाही माहित की यानंतर कोणते फ्रेंडली आणि दुसरे सामने होणार की नाही. पण या सामन्यासाठी माझं संपूर्ण कुटुंब हे माझ्या सोबत असेल.(retire) माझी पत्नी, माझी मुलं, माझे आई वडील, माझा भाऊ- बहीण इत्यादी सर्व नातेवाईक स्टेडियममध्ये असतील’.
2026 वर्ल्ड कपसाठी अर्जेंटिनाने क्वालिफाय केलं आहे. टीम 35 पॉईंट्स सोबत साउथ अमेरिकन क्वालिफायर टेबलमध्ये टॉपवर आहे. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी होणारा हा सामना अर्जेंटीनासाठी एक औपचारिक सामना असेल. पण मेस्सी आणि त्याच्या फॅन्ससाठी हा खूपच भावूक क्षण असेल.

आतापर्यंत मेस्सीने 193 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने वर्ल्ड कप क्वालिफायर 31 गोल केले आहेत. 2022 चा कतार वर्ल्ड कप जिंकून त्याने अर्जेंटिनाला 36 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन बनवले. (retire)ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते.मेस्सी 9 सप्टेंबर रोजी इक्वाडोर विरुद्ध क्वालिफायर सामना खेळू शकतो. पण तो सामना बाहेर असेल. त्यामुळे 4 सप्टेंबर हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा ब्युनोस आयर्सच्या प्रेक्षकांना त्यांच्या नायकांना घरच्या मैदानावर क्वालिफायरमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral