भारतीय क्रिकेट(cricket) संघाचा माजी कर्णधार आणि कोच राहिलेल्या राहुल द्रविडने आयपीएल 2026 पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिला आहे. टीम इंडियाच्या हेड कोच पदावरून पायउतार झाल्यावर राहुल द्रविड हा आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सचा हेड कोच बनला होता. राहुलने टीम इंडियाचा हेड कोच असताना संघाने टी 20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला होता.

राहुल द्रविडला(cricket) मागच्या वर्षी जेव्हा राजस्थान रॉयल्सचं हेड कोच बनवण्यात आलं तेव्हा फ्रेंचायझीला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. द्रविड संपूर्ण सीजन दरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र तरीही तो व्हीलचेअर आणि कुबड्यांच्या साहाय्याने तो संघासोबत ट्रॅव्हल करत होता आणि मैदानात सुद्धा त्यांना मार्गदर्शन करत होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा परफॉर्मन्स तरीही सुधारला नाही आणि 14 पैकी फक्त 4 सामन्यात राजस्थान रॉयल्सला यश मिळालं. ज्यामुळे राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी होते.
राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने म्हटले की, ‘राजस्थान रॉयल्सने आज घोषणा केली की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६ च्या आधी फ्रँचायझीसोबतचा त्यांचा कार्यकाळ संपवणार आहेत. राहुल अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या एका पिढीवर प्रभाव पाडला आहे, संघात मजबूत मूल्ये रुजवली आहेत आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर अमिट छाप सोडली आहे’.
राजस्थान रॉयल्सने(cricket) पुढे म्हटले की, ‘फ्रेंचायझीच्या स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुलला फ्रँचायझीमध्ये एक व्यापक पद देण्याचा प्रस्ताव होता, पण हा प्रस्ताव त्यांनी धुडकावला. राजस्थान रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुलने फ्रँचायझीसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो’.
राहुल द्रविडच्या कोचिंग अंतर्गत काही वाद सुद्धा झाले. असं म्हंटलं गेलं की कर्णधार संजू सॅमसनसोबत त्याचं बिनसलं होतं. दोघे एकमेकांचं बोलणं इग्नोर करत होते अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली होती. द्रविडने गेल्यावर्षी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संधी दिली होती. वैभवने त्याच्या विस्फोटक फलंदाजीने त्याचा निर्णय योग्य ठरवला.
हेही वाचा :
ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का
कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे
जिओने केला धमाका! लॉन्च केला AI वाला चश्मा, एका क्लिकवर फोटो, व्हिडिओ अन् कॉलिंगसुद्धा