पुष्पा चित्रपटाच्या निमित्ताने घराघरात पोहचलेला अल्लू अर्जुन(actor) हा नेहमीच चर्चेत असतो. तसेच संपूर्ण देशभरात त्याचा चाहता वर्ग आहे. मात्र, आता अल्लू अर्जुनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. नेमकं घडलं काय? चला जाणून घेऊयात.

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या(actor) घरी शोककळा पसरली आहे. अभिनेत्याची आजी आणि तेलुगू इंडस्ट्रीचे दिग्गज अल्लू रामलिंगैया यांच्या पत्नी अल्लू कनक रत्नम यांचे निधन झाले आहे. अल्लू कनक रत्नम यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आजीच्या निधनामुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. तसेच इंडस्ट्रीतही शांतता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनची आजी 94 वर्षांची होती. त्या अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. काल रात्री 1:45 वाजता त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
हेही वाचा :
जिओने केला धमाका! लॉन्च केला AI वाला चश्मा, एका क्लिकवर फोटो, व्हिडिओ अन् कॉलिंगसुद्धा
1 सप्टेंबरपासून चांदीवरही हॉलमार्कची मोहोर; ‘हे’ नियम लागू होणार, चांदीपण महागणार?
कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे