लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे.(arrive) त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल. ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु लवकरच हे पैसे दिले जातील.लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो. दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे यावेळीदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहेत.

गणेशोत्सवातदेखील लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मूहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातदेखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता. (arrive)यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातदेखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे.

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे. दरम्यान, यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. (arrive)लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे. त्यात ज्या महिला निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार