करोडपती होण्याचं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतो. (millionaire)मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, योग्य गुंतवणुकीचे पर्याय आणि सातत्य आवश्यक आहे. कमी उत्पन्न असणारी व्यक्तीही योग्य मार्गदर्शन व संयम पाळून करोडपती बनू शकते. यासाठी काही सोप्या पण प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे. करोडपती बनण्यासाठी चक्रवाढ व्याजाचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे. चक्रवाढ व्याजामुळे गुंतवणुकीवरील परताव्यावरही परतावा मिळतो, ज्यामुळे पैसा वेगाने वाढतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25व्या वर्षी दरमहा ₹5,000 गुंतवायला सुरुवात केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला, तर वयाच्या 50व्या वर्षी तो करोडपती होऊ शकतो.

बाजारातील चढ-उतारांमध्येही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे फायदेशीर ठरते. सातत्यामुळे रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगचा लाभ मिळतो आणि दीर्घकालीन परताव्यात सुधारणा होते.(millionaire)जास्त परतावा मिळवण्यासाठी काही प्रमाणात जोखीम घेणे आवश्यक असते. तरुण गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टीने इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. (millionaire)अल्पकालीन उद्दिष्टांसाठी कमी जोखीम असलेले डेट फंड किंवा इतर सुरक्षित साधने निवडावीत.
म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूकदारांचे पैसे विविध साधनांमध्ये शेअर्स, बाँड इ. गुंतवले जातात. SIP मधून दरमहा ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकालीन कोष तयार करता येतो. उदाहरणार्थ, 20 वर्षे दरमहा ₹10,000 SIP केल्यास आणि सरासरी 12% परतावा मिळाल्यास, एकूण ₹24 लाख गुंतवणुकीवर ₹1 कोटी पेक्षा जास्त निधी मिळवता येतो.

थेट शेअर्समध्ये गुंतवणूक उच्च जोखीम पण उच्च परताव्याचा पर्याय आहे. योग्य कंपन्यांचे शेअर्स दीर्घकाळ ठेवून मोठा नफा मिळवता येतो. मात्र यासाठी बाजाराचा सखोल अभ्यास आवश्यक आहे, अन्यथा तोटा होऊ शकतो. जमीन, घर किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करून भाडे व मूल्यवाढीचा फायदा मिळवता येतो. योग्य ठिकाणी आणि योग्य किमतीत खरेदी केल्यास रिअल इस्टेट दीर्घकालीन संपत्ती निर्माण करते. (millionaire)मात्र यासाठी मोठा निधी आवश्यक असतो.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार