आज, महिन्याच्या पहिल्या दिवशी, १ सप्टेंबर रोजी, सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सोने १०० रुपयांनी कमी झाले आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०२,५०० रुपयांच्या आसपास आहे. त्याच वेळी, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याची(gold) किंमत ९६,१०० रुपयांच्या वर आहे. १ सप्टेंबर २०२५ साठी सोन्याची किंमत येथे जाणून घ्या. त्यामुळे सोने खरेदी करायचे असल्यास आजचा दिवस चांगला आहे.

चांदीची किंमत
चांदीची किंमत १,२४,९०० रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज चांदी स्वस्त झाली आहे. चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. गणपतीच्या दिवसात सोनं (gold)आणि चांदीला जास्त प्रमाणात मागणी असते. विशेषतः चांदीला. त्यामुळे तुम्हाला गौरी गणपतीसाठी खरेदी करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. त्वरीत तुम्ही जाऊन चांदीची खरेदी करून घेऊ शकता.
1 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव
शहराचे नाव | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
---|---|---|
दिल्ली | ९६,३४० | १,०२,५०९ |
मुंबई | ९६,१९० | १,०२,४९४ |
चेन्नई | ९६,१९० | १,०२,४९४ |
कोलकाता | ९६,१९० | १,०२,५०९ |
जयपूर | ९६,३४० | १,०२,५०९ |
नोएडा | ९६,३४० | १,०२,५०९ |
गाझियाबाद | ९६,३४० | १,०२,५०९ |
लखनऊ | ९६,३४० | १,०२,५०९ |
बेंगळुरू | ९६,१९० | १,०२,४९४ |
पटना | ९६,१९० | १,०२,४९४ |
भारतातील सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय किमती, आयात शुल्क, कर आणि डॉलर-रुपया विनिमय दर यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. यामुळेच सोन्याचे दर दररोज बदलत राहतात. भारतीय संस्कृतीत सोने हे केवळ दागिनेच नाही तर गुंतवणूक आणि बचतीचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. लग्न आणि सणांमध्ये त्याची मोठी मागणी असते.
सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. यातील काही घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर, अमेरिकन डॉलरचा विनिमय दर आणि लग्न आणि सणांच्या काळात सोन्याची मागणी. भू-राजकीय तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढतात तेव्हा भारतातील सोन्याचे दर वाढतात, कारण सोने हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो आणि महागाईपासून बचाव करतो.
भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचा भाव वेगवेगळा असतो कारण देशात सोन्याच्या दराबाबत अद्याप एकच दर निश्चित झालेला नाही. वेगवेगळ्या राज्ये आणि शहरांमधील स्थानिक कर आणि दागिने बनवण्याच्या शुल्काव्यतिरिक्त, काही इतर घटक देखील सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात. साधारणपणे, दक्षिणेकडील चेन्नई शहरात सोन्याची किंमत सर्वात वेगाने वाढते किंवा कमी होते.
हेही वाचा :
अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत
आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात,
गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय! मद्यविक्री बंद