सध्या कापूस आणि सोयाबीनच्या दरांमध्ये मोठा दबाव आहे. बाजारपेठेत भाव हमीभावापेक्षा खाली असल्याने शेतकऱ्यांना (Farmers)थेट तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हमीभावाने विक्री हा शेतकऱ्यांसाठी लाभदायी पर्याय ठरत आहे.

मात्र, सातबारा उताऱ्यावर पीक नोंद नसल्यास हमीभावाने विक्री करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कृषी विभागाने ई-पीक पाहणीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना(Farmers) तातडीने पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीचे फायदे :
ई-पीक पाहणी पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना अनेक शासकीय लाभ थेट मिळतात. यात पीकविमा भरपाई, अतिवृष्टीची मदत, हमीभावाने विक्रीची परवानगी, शासकीय योजनांचा लाभ, तसेच लागवडीचा अचूक अंदाज या सुविधा समाविष्ट आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे यंदा ई-पीक पाहणीची गती वाढली असून ज्यांनी अद्याप केली नाही त्यांनी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन राज्य समन्वयक सरिता नरके यांनी केले आहे.
बाजारातील भाव आणि सरकारचा हमीभाव :
सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ₹7,710 आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ₹8,110 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुले बाजारात दर हमीभावापर्यंत पोहोचणे कठीण दिसत आहे. सोयाबीनसाठी हमीभाव ₹5,328 असून बाजारात ते सध्या फक्त ₹4,300 ते ₹4,600 दरम्यान विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची भिस्त हमीभावावर होणाऱ्या सरकारी खरेदीवर आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत कापूस आयातीवरील 11 टक्के शुल्क काढून टाकल्यामुळे आयात वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भाव आणखी दबावात राहतील.
हेही वाचा :
अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत
आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात,
गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय! मद्यविक्री बंद