अमेरिकेत पुन्हा एकदा विमानाचा(flight) भीषण अपघात घडला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वांना हादरवले आहे. एका छोट्या विमानाचा उड्डाणादरम्यान अचानक अपघात झाला आहे. वैमानिकाला विमानातील तांत्रिक बिघाडामुळे थेट समुद्रात लॅंडिग करावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाचे इंजिन अचानक बंद झाल्याने हा अपघात घडला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

वैमानिकाने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानाचे इंजिन अचानक बंद पडले. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली होती. मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. यामुळे वैमानिकाने विमानाचे(flight) थेट समुद्रात लॅंडिग केले. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.

ही घटना नॉर्थ कॅरोलिनाच्या आइसलॅंडजवळ घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण वैमानिकाने विमानाचे पाण्यात लॅंडिग केले यामुळे कोणतीही जीवितहानी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. वैमानिकाचे प्राण धोक्यात आले होते. पण बचाव पथकाने तातडीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

स्थानिक लोकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली होती. काही सेकंदातच लोकांनी वैमानिकाला बाहेर काढले. वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि किरकोळ जखमांवर उपचार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शनींच्या मते, हे दृश्य अगदी एखाद्या चित्रपटातील अपघातासारखे होते.

त्यानंतर बचाव पथकाने विमानही समुद्रातून बाहेर काढले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. इंजिन कोणत्या कारणामुळे बंद पडले याची चौकशी सुरु आहे. तसेच वैमानिकाच्या हुशारीची सर्वजण कौतुक करत आहे. त्याने स्वत:सोबत इतरांचेही प्राण वाचवले आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

हेही वाचा :

‘कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं…’ सख्ख्या मैत्रीणीला गमावल्याने प्रार्थना भावुक

गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका!

Dream11 पेक्षाही मोठी डील, टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचा लोगो झळकणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *