कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी किमान सहा महिने सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळत होता. परंतु नव्या नियमांनुसार आता केवळ एका महिन्याची नोकरी केलेल्या व्यक्तीलाही कर्मचारी(employees) पेन्शन योजना अंतर्गत पेन्शनसाठी पात्र ठरवलं आहे.

‘झिरो कम्प्लीट इयर’ नियम रद्द :
पूर्वी ‘झिरो कम्प्लीट इयर’ नियमानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा केली असेल तर त्याला पेन्शनचा हक्क नसायचा.
उदाहरणार्थ, पाच महिने नोकरी केलेल्या व्यक्तीलाही पेन्शन मिळत नसे. मात्र, हा अन्यायकारक नियम आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अगदी एका महिन्याच्या सेवेनंतरही ईपीएस अंतर्गत भरलेले योगदान वाया जाणार नाही.
पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना :
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडली असेल, तर सर्वप्रथम तुमच्या पीएफ पासबुकची तपासणी करा. जर त्यात पेन्शनसाठीची रक्कम जमा झालेली दिसत नसेल, तर 2024 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तुम्ही ईपीएफओ कार्यालयात तक्रार करू शकता.
नोकरीच्या कालावधीत नियोक्ता आणि कर्मचारी दोघे मिळून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा करतात. या पैशातील काही भाग कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जमा केला जातो. त्यामुळे आता अल्पकालीन नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना (employees) याचा थेट फायदा होणार आहे.
व्याजदर आणि आर्थिक सुरक्षितता :
ईपीएफओ फक्त बचत सुरक्षित ठेवत नाही, तर त्यावर दरवर्षी व्याजही देते. आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओने 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला असून ही रक्कम आता खातेधारकांच्या खात्यात जमा केली जात आहे. नोकरदारांसाठी ही योजना निवृत्तीनंतरचा मोठा आर्थिक आधार ठरते.
हेही वाचा :
‘कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं…’ सख्ख्या मैत्रीणीला गमावल्याने प्रार्थना भावुक
गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका!
Dream11 पेक्षाही मोठी डील, टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचा लोगो झळकणार?