मुंबईत सुरू असलेल्या मराठा (Maratha)आंदोलकांसाठी राज्यातील विविध गावामधून भाकऱ्या, चपाती, पुरी चटणी, ठेचा, पेरू, केळी, लोणची पाठवली होती. मराठा आरक्षणा संदर्भातील 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठे पुन्हा आपल्या गावी परतले आहेत. मराठ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरु केल्यानंतर त्यांची गर्दी पाहता हॉटेल्स, दुकानं बंद करण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. यामुळे अनेक आंदोलकांना उपाशी पोटी राहावं लागलं होतं.

यानंतर राज्यभरातून मराठा (Maratha)आंदोलकांसाठी जेवण पाठवण्यास सुरुवात झाली होती.नवी मुंबईतही सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग लागला होता. यात अनेक प्रकारची चटणी, लोणची यांचा समावेश होता. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलकांसाठी राज्यातील विविध गावामधून भाकऱ्या, चपाती, पुरी चटणी, ठेचा, पेरू, केळी, लोणची पाठवली होती.

आंदोलक सकाळी जेवल्यानंतर, दुपारचं जेवण सोबत नेऊन मुंबईत जाऊन आंदोलन करायचे आणि रात्री पुन्हा नवी मुंबईत येथे येऊन जेवायचे.जवळपास लाखाच्या घरात भाकरी आल्या होत्या ज्या पडून आहेत त्यातील बरचसे अन्न हे खराब झाले आहे. मराठा(Maratha) आंदोलकांची आबाळ होऊ नये यासाठी या पाठवण्यात आला असून दोन लाख पाण्याच्या बाटल्या पाठवल्या होत्या. पण आंदोलनानंतर हे अन्न असंच राहिलं होतं, जे नंतर नवी मुंबई पालिकेकडून उचलण्यात आलं.
हेही वाचा :
प्रियांकाने उघड केलं शाहरुखशी निगडीत रहस्य!
Maratha-OBC वाद पेटणार, नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा….
सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक….