राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना, शिवसेनेतील राजकीय घडामोडींनी चर्चांना वेग दिला आहे. महायुतीतील वाद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister)यांचा दिल्ली दौरा यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबारमध्ये प्रचार करत असताना म्हणाले, “जर आजही जनतेला विचारले तर त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री कोण आहे, जनता एकनाथ शिंदे यांना मान्यता देईल. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही. काळजी करू नका, परत हा महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे करताना आपण सर्वजण पाहणार आहोत.”

भुसे यांनी पुढे सांगितले की एकनाथ शिंदे प्रत्येक नागरिकाला भेटतात आणि जनतेशी संवाद साधल्याशिवाय झोपत नाहीत. त्यांनी अजित पवार यांचीही प्रशंसा करत, राज्यातील इतिहासात इतक्या सह्य करणारा मुख्यमंत्री इतर कोणी पाहिला नाही असे विधान केले.भुसे यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय(Chief Minister) चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी नंदुरबार नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार असल्याचीही माहिती दिली आणि नगरपालिकेच्या विकासासाठी आवश्यक निधी एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत युती केली होती आणि त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले होते. आता दादा भुसे यांच्या विधानानंतर, पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे कडे जाईल का? हे भविष्यात दिसून येणार आहे.

हेही वाचा :

डि.के.ए.एस.सी काॅलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मला पाहिजे ते तुम्ही द्या…’ शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ…

स्मृती मानधना – पलाश मुच्छलचं लग्न होणार की नाही? आईनेच केला खुलासा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *