महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ काही दिवसांत संपणार असून, नव्या अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे(politics).

सध्या भाजपमध्ये पाच मोठी नावे चर्चेत आहेत –
देवेंद्र फडणवीस
मनोहरलाल खट्टर
शिवराज सिंह चौहान
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
भूपेंद्र यादव
अनुराग ठाकूर
भाजप अध्यक्षपदाची निवडणूक राज्यातील प्रदेक्षाध्यक्षांची निवड झाल्यानंतर घेतली जाईल. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विश्वासाला पात्र नेत्यावर ही जबाबदारी दिली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. देवेंद्र फडणवीस हे तरुण नेते असून, संघाचा पाठिंबा आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर आहे. या सर्व चर्चांवर फडणवीस यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपने संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असून, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. बिहार निवडणुकीनंतर या यादीवर अंतिम निर्णय घेतला जाईल.पक्षातील सूत्रांचे म्हणणे, “फडणवीस यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी गांभीर्याने विचार होऊ शकतो,” अशी शक्यता वर्तवली जात आहे(politics).
हेही वाचा :
संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….
फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक