पालिका निवडणुकीत घराणेशाहीचा अक्षरशः कळस गाठला आहे. सत्ता गाजवणाऱ्या पक्षांच्या अनेक नेत्यांच्या कुटुंबांत एक-दोन नव्हे, तर थेट सहा जणांना उमेदवरी(candidates)देण्यात आली आहे. कोणत्या पक्षात, कोणत्या नेत्यांच्या घराण्याने हा विक्रम केला, यावरचा हा सविस्तर रिपोर्ट, महाराष्ट्राच्या राजकारणाता गेल्या अनेक दशकांपासून रुजलेली घराणेशाही आता अधिकच बळकट होऊ लागली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत एकाच घरातील तब्बल सहा सदस्यांना दिलेली उमेदवारी.

या घटनामुळे साध्या कार्यकर्त्यांच्या राजकारणातील स्थानावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका फक्त सतरंज्या उचलण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा सवाल पुन्हा ऐकू येऊ लागला आहे.शिंदेसेनेचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील तब्बल सहा जणांना पक्षाकडून उमेदवारी (candidates)देण्यात आली आहे. यात वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे, भावजई उषा म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचा समावेश आहे. एकााच घरातील या सहा सदस्यांना दिलेल्या तिकिटांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
या घडामोडीनंतर भाजपनं शिंदेसेनेवर थेट घराणेशाहीचा आरोप केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे उमेदवारी दिल्याचा दावा शिंदेसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केला आहे.दरम्यान, भाजपा स्वतःही अशा वादातून सुटलेली नाही. नांदेडमधील लोहा नगरपरिषदेत भाजपानंही एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं उघड झालं होतं. तसेच, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या घरातील महिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेतही वेगळं चित्र नसल्याचं या पालिका निवडणुकीत स्पष्टपणे समोर आलंय. खरंच उमेदवार न मिळाल्याने नेते अशा प्रकारे कुटुंबियांना उमेदवारी देत असतील, तर लोकशाहीची ही अत्यंत दयनीय अवस्था असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे.लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यासोबतच नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देऊन भाजपनं घराणेशाहीचीच परंपरा पुढे चालवली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गजानन सूर्यवंशी यांच्यासोबत उमेदवारी मिळालेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये- पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे
यांचा समावेश आहे.
एकाच घरातील या सहा सदस्यांना दिलेल्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे घराणेशाही चालत नाही, असा दावा करणाऱ्या नेत्यांनीच प्रत्यक्षात एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना उमेदवारी दिल्याने तीव्र टीका होत आहे.या पालिका निवडणुकीत जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये घराणेशाहीचं प्रमाण प्रकर्षाने जाणवलं आहे. कुळगाव-बदलापूर आणि लोहा नगरपरिषद ही सर्वाधिक चर्चेत असलेली उदाहरणे ठरली आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा मार्ग बंद होतोय का, असा प्रश्न यामुळे अधिक तीव्र झाला आहे.

हेही वाचा :
एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….
RBI डिसेंबर MPC मध्ये घेणार मोठा निर्णय! घरकर्जसह इतर कर्जाचे EMI कमी होण्याची शक्यता