सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे.(making)नियमित गुंतवणुकीतून वेळेनुसार मोठा निधी तयार होऊ शकतो. मात्र, काही सामान्य चुका केल्यामुळे गुंतवणूकदार अपेक्षित परताव्यापासून वंचित राहतात. SIP करताना या पाच चुका टाळल्यास तुमच्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल.

उत्पन्न वर्षानुवर्षे वाढत जाते – वेतनवाढ, नवीन व्यवसाय किंवा साइड इन्कममुळे. मात्र अनेक गुंतवणूकदार SIP ची रक्कम तशीच ठेवतात आणि खर्च मात्र वाढवत जातात. दरवर्षी 10% ते 20% SIP रक्कम वाढवली, तर दीर्घकालीन कोष अनेक पटीने वाढू शकतो.IDCW म्हणजे लाभांश योजना. यात मिळणारे पैसे पुन्हा गुंतवले जात नाहीत, त्यामुळे कंपाउंडिंगचा फायदा कमी होतो. तर ग्रोथ प्लॅनमध्ये परतावा पुन्हा फंडात गुंतवला जातो आणि निधी जलद वाढतो. कराच्या दृष्टीनेही ग्रोथ प्लॅन फायदेशीर आहे.
अनेकजण SIP सुरू करतात पण त्यामागे स्पष्ट उद्दिष्ट नसते. उद्दिष्ट नसल्यास गुंतवणुकीचा कालावधी, रक्कम आणि फंड निवड याबाबत गोंधळ होतो.(making) SIP ला निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्न, घरखरेदी किंवा परदेश प्रवास यांसारख्या ठराविक उद्दिष्टांशी जोडा. SIP सुरू करून ती विसरणे चुकीचे आहे. दरवर्षी फंडाची कामगिरी तपासणे आवश्यक आहे. फंड 18 ते 24 महिने सतत कमी परफॉर्म करत असेल, तर बदलाचा विचार करा.

तसेच, ॲसेट ॲलोकेशन बिघडले असल्यास ते परत संतुलित करा. उदाहरणार्थ, लक्ष्य 60% इक्विटी + 40% डेट असेल, पण इक्विटी वाढून 75% झाली तर काही नफा बुक करा किंवा SIP मध्ये बदल करा.(making)बाजार पडला की SIP थांबवणे आणि वाढला की पुन्हा सुरू करणे ही सर्वात मोठी चूक आहे. SIP चे यश हे रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग आणि कंपाउंडिंगवर आधारित आहे, ज्यासाठी दीर्घकालीन सातत्य आवश्यक आहे.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार