केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(credited) केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. छत्तीसगड सरकारनेही लाडली बहना योजना राबवली आहे. आता या योजनेचा ३२वा हप्ता जमा करण्यात आला आहे.छत्तीसगडचे सीएम मोहन यादव यांनी डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आज दुपारी २ वाजता मोहन यादव एका कार्यक्रमातून महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील.लाडली बहना योजनेत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यामध्ये तु्म्ही अधिकृत वेबसाइटवर cmladlibahna.mp.gov.in जाऊन पैसे आले की नाही त्याची स्थिती चेक करु शकतात.

पैसे आले की नाही कसं चेक करायचं?
सर्वात आधी तुम्हाला cmladlibahna.mp.gov.in या (credited)वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज आणि पेमेंट स्टेट्सवर क्लिक करा.
यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कळणार आहे.
लाडली बहना योजना सुरु होऊन वर्ष होऊन गेले आहेत. (credited)आतापर्यंत महिलांच्या खात्यात ३१ हप्ते जमा झाले आहेत. आज ३२वा हप्ता जमा केला जाणार आहे. दरम्यान, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात योजनेचा हप्ता वाढवून देण्यात आला होता. यानंतर पुढे भविष्यात या योजनेचा हप्ता ३००० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असंही सांगितलं आहे. २०२८ पर्यंत हप्ता ३००० रुपये करणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू