भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवलाय.(furious)लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाहीये. त्यामुळं लाडकींनी महामार्ग आडवत संताप व्यक्त केलाय. मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई – कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याय…

लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं (furious)आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंततरी लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाही. त्यामुळं भंडाऱ्यात महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात रोष बघायला मिळालं आहे.
मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं (furious)यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई – कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. भंडारा शहरातील नागपूर नाका इथं या महिलांनी रस्त्यावर उतरतं ठिय्या आंदोलन करून हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्यात. महिलांच्या या आक्रमक पवित्रामुळं पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली. प्रशासनानं समजूत काढल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर खोळंबलेली वाहतूक काही काळानंतर सुरू झाली.
हेही वाचा :