राज्य मंत्रिमंडळाने कारखाना अधिनियम १९४८ मध्ये मोठे बदल मंजूर केले असून, कामगारांच्या कामकाजाच्या तासांत वाढ करण्यात आली आहे. आता कामाचे दिवसाचे तास (hours)९ वरून थेट १२ तासांपर्यंत वाढणार आहेत. यासोबतच आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ वरून ६० करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक ३ सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार निर्मिती आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कलम ५४ : दिवसाचे कामकाजाचे तास ९ ऐवजी आता १२ तास असतील.
कलम ५५ : सलग ५ तासांच्या कामानंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांती अनिवार्य.
कलम ५६ : आठवड्याचे कामाचे तास ४८ वरून ६० करण्यात आले.
कलम ६५ : अतिरिक्त कामकाजाची (ओव्हरटाईम) मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली.
कामगारांकडून अतिरिक्त वेळेत घेतलेल्या कामासाठी आता दुप्पट दराने मोबदला द्यावा लागणार आहे. शिवाय, अतिकालिक काम करण्यासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक राहील.कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले की, या दुरुस्तीमुळे उद्योग क्षेत्रात अधिक लवचिकता येईल आणि पारदर्शकता वाढेल. Ease of Doing Business च्या धोरणानुसार हे बदल महत्त्वाचे ठरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास मान्यता दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये यापूर्वी अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रानेही आता त्याच धर्तीवर कामगार कायद्यात बदल केले आहेत.या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला उत्पादन वाढविण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. दुसरीकडे, कामगारांना जास्त तास(hours) काम केल्यास दुप्पट मोबदला आणि विश्रांतीचा अधिकार मिळेल. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत कामगारांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर याचा नेमका परिणाम काय होईल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
मोदी सरकारचं GST गिफ्ट दैनंदिन वस्तू स्वस्त…..
AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता?
सप्टेंबर महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे?