हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. (worship)हा दिवस महादेव आणि पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. काही दिवशी महादेवांना काही गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते.

सप्टेंबर महिन्यामधील पहिले प्रदोष व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाणार आहे. यावेळी सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग आहे. हा दिवस(worship) महादेवांना समर्पित आहे. हे व्रत केल्याने धन आणि संपत्तीची कमतरता राहत नाही, अशी मान्यता आहे. तसेच भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीला त्याच्या सर्व नकळत पापांपासून मुक्तता मिळते आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळतात. सप्टेंबर महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, काय आहे मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त
त्रयोदशी तिथीची सुरुवात शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.9 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.14 वाजता होईल. ज्यावेळी त्रयोदशी तिथी येते त्यावेळी प्रदोष व्रत पाळले जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. शुक्रवारी प्रदोष व्रत येत असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाते.

प्रदोष व्रताच्या वेळी या गोष्टी अर्पण करा
कणेरचे फूल
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कणेराचे फूल अर्पण करावे. हे फूल महादेवांचे खूप प्रिय मानले जाते. हे फूल पांढऱ्या आणि लाल रंगात असते. ते खूप शुभ मानले जाते.

शमीचे फूल
महादेवांना अनेक फुले आवडतात. त्यापैकी शमीचे फूल त्यांना सर्वांत जास्त आवडते आणि हे फूल शुभ देखील मानले जाते. वेद आणि पुराणांमध्येही शमी वृक्ष आणि फुलांचा उल्लेख आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शमीचे फूल अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

आकचे फूल
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आकचे फूल अर्पण करावे. आकचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिवलिंगावर हे फूल अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

धतुराचे फूल
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना धतुराचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तसेच धतुराचे फळ देखील शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते. हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीचे पाप दूर होतात असे म्हटले जाते.

प्रदोष व्रताचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, शुक्र प्रदोष व्रताच्या वेळी वैवाहिक जीवन आनंदी राहते. शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने भौतिक आणि सुख साधनांमध्येही वाढ होते. त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते.

हेही वाचा :

प्रियांकाने उघड केलं शाहरुखशी निगडीत रहस्य!
Maratha-OBC वाद पेटणार, नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा….
सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *