नागपूर : नागपूर-अमरावती रोडवरील कोंढाळीनजीक बाजारगाव परिसरात असलेल्या स्फोटके तयार करणाऱ्या आणि सोलार कंपनीत(company) बुधवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, १७ कामगार जखमी झाले आहेत.स्फोटापूर्वी अचानक फायर अलार्म वाजल्याने कामगारांना तातडीने प्लांटच्या बाहेर जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरीही उडालेल्या मलब्यात अनेक जण सापडले असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे, धर्मपाल मनोहर यांचा समावेश आहे. जखमींना अमरावती रोडवरील दंदे हॉस्पिटल तसेच नागपूरमधील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कामगाराचा मृतदेह सापडला असून, दोन जणांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना धंतोली येथील राठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्फोटानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून कंपनीच्या (company)आत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहा जखमींना नागपूरकडे हलविण्यात आले.दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही कंपनी देशाच्या संरक्षण विभागासाठी महत्त्वाची उत्पादने तयार करते. त्यामुळे या स्फोटाकडे सुरक्षा दृष्टीनेही गंभीरतेने पाहिले जात असून, अचूक कारणांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :
संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….
फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक