पुणे/दिल्ली : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता(actor) आशिष कपूर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद झाली असून, पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून ही कारवाई केली.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका हाऊस पार्टीदरम्यान आशिषने बाथरूममध्ये तिच्यावर मारहाण केली आणि बलात्कार केला. घटनेनंतर ११ ऑगस्टला प्राथमिक तक्रार दाखल झाली. सुरुवातीला महिलेने इतर काही व्यक्तींची नावे तक्रारीत नमूद केली होती, मात्र नंतरच्या जबाबात फक्त आशिषवरच आरोप कायम ठेवला.

महिलेने असा दावा केला आहे की घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला होता. मात्र, पोलिसांना अद्याप असा कोणताही व्हिडिओ हाती लागलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांनुसार आशिष आणि ती महिला बाथरूममध्ये बराच वेळ एकत्र होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.

या घटनेत आशिषचा मित्र, त्याची पत्नी आणि आणखी दोन व्यक्तींवरही एफआयआर दाखल झाली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, आशिष आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला, तर मित्राच्या पत्नीने तिला मारहाण केली. मात्र, तपासानंतर आशिष आणि त्याच्या पत्नीला जामीन मिळाला आहे.

आशिष कपूर(actor) हा टीव्ही विश्वातील परिचित चेहरा आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, सरस्वतीचंद्र, लव्ह मॅरेज या अरेंज मॅरेज, चाँद छुपा बादल मे, देखा एक ख्वाब, ये रिश्ता क्या कहलाता है, वो अपना सा आणि बंदिनी या मालिकांमध्ये तो दिसला आहे.

हेही वाचा :

वेस्टर्न स्टाईलमध्ये Fork-Spoon ने आजीने केले जेवण; VIDEO व्हायरल

कामाच्या तासांत होणार वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

मोदी सरकारचं GST गिफ्ट दैनंदिन वस्तू स्वस्त…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *